पावसाळ्यात जगायचं कसं? कोळी बांधवांच्या नेमक्या समस्या काय? पाहा व्हिडीओ....

पावसाळ्यात जगायचं कसं? कोळी बांधवांच्या नेमक्या समस्या काय? पाहा व्हिडीओ….

| Updated on: Jun 23, 2023 | 7:14 PM

मासेमारी हा कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर खासकरून मुंबईच्या किनारपट्टीवरील कोळी बांधव समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. परंतु पावसाची सुरुवात होतात दरवर्षी कोळी बांधव त्यांची गलबतं माघारी घेतात.

मुंबई : मासेमारी हा कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर खासकरून मुंबईच्या किनारपट्टीवरील कोळी बांधव समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. परंतु पावसाची सुरुवात होतात दरवर्षी कोळी बांधव त्यांची गलबतं माघारी घेतात. यावेळी नौकांची डागडुजी आणि जाळी दुरुस्तीची कामं कोळी बांधव करत असतात. मात्र या काळात कोळी बांधवांना समुद्रात जाण्याची कायदेशीर मनाई असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. कोळी बांधवांसाठी प्रशासन घोषणा तर करतोच पण प्रत्यक्षात अमंलबजावणी करताना दिसत नाही. कोळी बांधवांच्या नेमक्या या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jun 23, 2023 07:14 PM