Devendra Fadnavis | संजय राऊतांनी शिवसेनेची काय अवस्था करुन ठेवली आहे? फडणवीसांचा राऊतांना टोला
Devendra Fadnavis on Raut | संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची परिस्थिती अशी झाल्याची खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis on Raut | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. राऊतांनी पक्षाची काय अवस्था करुन ठेवली आहे, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राजकारणातील संवेदनशील माणसाविषयी प्रश्न विचारण्याची विनंती ही त्यांनी पत्रकारांना केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) वाढल्याबद्दल त्यांना विचारले असता, विरोधकांचे कामच टीका करणे असते, पण सध्याचे विरोधकच पूर्वी सत्तेत होते आणि त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती ओढावल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात सत्ताकारण होत असल्याबद्दल, बदल तर होतातच असे त्यांनी सांगितले. दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. राऊतांनी पक्षाची काय अवस्था करुन ठेवली आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.