‘मी काल मोदीजींना फोन केला आणि …,’ काय म्हणाले एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार यावरुन गेली चार दिवस सस्पेन्स कायम असताना आज अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका सविस्तर विशद केली आहे.
महाराष्ट्रात निवडणूक निकालात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले खरे परंतू राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम होता. राज्यातील निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेल्या एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचा फायदा राज्यात झाला म्हणून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यात भाजपाचे केंद्रापासून सर्व नेते राज्यात देवेंद्र फडणवीस यांना आता संधी द्यावी असे मत मांडत होते. त्यानंतर चार दिवस राज्यात सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावरुन चर्चा सुरु होती. अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपली बाजू मांडली. आपल्या केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संधी दिल्याने आपण जनतेची सेवा करु शकलो याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. मी नाराज होऊ रडणारा नेता नाही लढणारा नेता आहे. राज्यात जनतेसाठी मला शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करायचे आहे असेही शिंदे यांनी सांगितले.जनतेला लाडकी बहिण, लाडका भाऊ यांना निधी देता आला असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अडीच वर्षांच्या काळात केंद्र सरकार चट्टाण सारखे पाठीशी राहीले, केंद्राकडून मी राज्यासाठी निधी मिळविला. सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद आहे, म्हणून मी काल नरेंद्र मोदींना फोन केला, सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण नाही .तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.