एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा

जिथे ताकद आहे तिथे जोर लावायचा आहे. जिथे ताकद नाही तिथे उमेदवार पाडायचा आहे.निवडून येणाऱ्या जागांवर चर्चा करूया, मुस्लिम आणि आंबेडकरी नेते येतील त्यांच्या जागा सांगतील, त्यावर चर्चा करू. कमीत कमी10 ते 15 आपल्या हक्काचे आहेत, हे म्हणायला होईल. 200 लढून पडण्यात काही अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
| Updated on: Nov 03, 2024 | 1:38 PM

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अखेर विधानसभा निवडणूकीला उमेदवार उभे करण्याचा निर्णय आज घेतला आहे. जिथे ताकद आहे तिथेच जोर लावायचा, जिथे ताकद नाही तिथे उमेदवार पाडायचा. फक्त एससी एसटीच्या उमेदवारांना मराठ्यांचं मतदान करायचं आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही आमच्या उमेदवारांकडून बाँड लिहून घेणार आहे..तसेच व्हिडिओग्राफी देखील करून घेणार. पण हे काही व्हायरल करणार नाही. कारण आपल्याला कुणाला अडचणीत आणयचे नाही असे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. आता आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत आणि निवडून येणार तेवढेच निवडणूक लढणार आहेत. लढण्याची इच्छा अनेकाची असते. परंतू आपल्याला समाज जपायचा आहे. राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये. एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा. पण उमेदवार पडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. आपल्याला थोडे उमेदवर द्यायचे आहेत. आपल्या आपली माणसं तेथे आपली कामे करण्यासाठी पाठवायची आहेत. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर संपूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही म्हणून निवडून येणाऱ्या जागांवर चर्चा करू असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.

 

Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.