शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या वादावर नेमंक काय म्हणाल्या सुप्रिया सुळे; पाहा व्हिडिओ
पुण्यातील(Pune) प्रति पंढरपूर म्हणजेच विठ्ठलवाडी येथे सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे(Supriya Sule) यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. शिवसेना कुणाची? या वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पुणे : पुण्यातील(Pune) प्रति पंढरपूर म्हणजेच विठ्ठलवाडी येथे सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे(Supriya Sule) यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. शिवसेना कुणाची? या वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ते हयात असतानाच शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण हे ठरवलं होतं. मात्र, आता शिवसेनेची फूट पडत आहे याचा अर्थ खुद्द बाळासाहेबांनाच दुखणं असा होत आहे. मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादीने शिवसेनेला नेहमीच मदत केलेली आहे आणि यापुढेही करत राहणार. जर हे मुख्यमंत्री म्हणत असेल पुढे 25 वर्ष आमचं सरकार असणार आहे तर त्यांना शुभेच्छा. आता आलेला सरकार सत्ता आणि पैशाचं राजकारण करण्यासाठी आलेला आहे त्यांना समाजासाठी काहीही करायचं नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले.