तुम्ही मुंबईसाठी काय केलं? थेट शिवसेना खासदाराला कुणी केला हा सवाल
देशाचे पंतप्रधान हे पंतप्रधान असल्यासारखे वावरताना दिसत नाहीत. तसे वागत नाहीत. भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे ते वागत आहेत.
मुंबई : पंतप्रधान मोदी ( pm narendra modi ) यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आपले नाव नाही. पण, मिंधे गटाचे दोन ( shinde group ) आणि भाजपच्या ( bjp mp ) तीन खासदारांची नावे आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात. पण ते भाजपचे असल्यासारखे वागतात अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत ( arvind sawant ) यांनी केली.
तिळावर पलटवार करताना मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार ( ad. ashish shelar) यांनी अरविंद सावंत यांनी कदाचित कार्यक्रम पत्रिका बघितली नसेल. स्वतःचा झालेला जळजळाट, जळजळात आणि थयथयाट यामुळे पत्रिका पहायला ते विसरले असतील. त्या पत्रिकेत सर्व आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य यांची नवे आहेत, असे स्पष्ट केले.
ज्यांची नवे आहेत त्या सर्वाना कार्ड पोहोचवली आहेत. जर ती मिळाली नसतील तर ती प्रशासनाची चूक आहे. ज्या पद्धतीने निमंत्रणात खासदार, आमदार यांचा उल्ल्लेख आहे यापेक्षा काही वेगळं असं जर अरविंद सावंत याना अपेक्षित असेल तर त्यांनी मुंबईसाठी काय केलं असा टोलाही शेलार यांनी लगावला.