Raju Shetty : ऊस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांचा नेमके प्रश्न काय? म्हणून तर शेतकरी आक्रमक

Raju Shetty : ऊस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांचा नेमके प्रश्न काय? म्हणून तर शेतकरी आक्रमक

| Updated on: Sep 17, 2022 | 9:32 PM

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नसतील अशाप्रकारे संताप व्यक्त होणारच असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सुनावले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अधिकचे साखर उत्पादन होऊन देखील शेतकऱ्यांना न्याय दिला जात नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

कोल्हापूर : आता यंदाचा (Sugarcane Sludge) गाळप हंगाम तोंडावर आला आहे. असे असताना देखील एक रकमी (FRP) एफआरपीचा मुद्दा राज्यात गाजत आहे. शेतकऱ्यांना आश्वासन देणारे साखर कारखानदार ऐनवेळी शेतकऱ्यांची अडवणूक करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचे आश्वासन दिले होते. पण हसन मुश्रीफ यांच्यासह इतरांकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी हा रस्त्यावर उतरुन ट्रॅक्टरचे टायर जाळत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नसतील अशाप्रकारे संताप व्यक्त होणारच असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Raju Shetty) राजू शेट्टी यांनी सुनावले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अधिकचे साखर उत्पादन होऊन देखील शेतकऱ्यांना न्याय दिला जात नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published on: Sep 17, 2022 09:32 PM