Video: उद्धव ठाकरेंची ‘ती’ सभा नव्हे तर काय मग! नवनीत राणांनी स्पष्टच सांगितले?
उद्धव ठाकरे यांच्यावर कायम टीकास्त्र करणाऱ्या नवनीत राणा यांनीही त्यांच्या सभेवर बोचरी टीका केली आहे.
अमरावती: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यावर आता विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी तर पक्षाचे अस्तित्व आणि उद्धव ठाकरे यांचे भवितव्य काय हे देखील स्पष्ट केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर कायम टीकास्त्र करणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही त्यांच्या सभेवर बोचरी टीका केली आहे. त्यांच्या बोलण्यातून ते कुणाला अव्हान देत नव्हते तर त्यांचा तो अहंकार होता. शिवाय सर्वासमोर आपण केलेल्या चुकांची कबुली देण्याची ती चांगली संधी होती. पण ती देखील त्यांनी गमावल्याचे राणा यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणुक ते म्हणत असतील तर जे दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात ते स्वत:च खड्ड्यात पडतात असा टोलाही राणा यांनी लगावला आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा…?
– महानगपालिका निवडणुकीमध्ये मुंबई मधील जनता उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवेल.
– उद्धव ठाकरे यांच्या भाषणात अव्हान नव्हते तर अहंकार होता.
– मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन दहा जनपत मध्ये किती लोटांगण घातले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहले आहे
– बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यावरुन माफी मागण्याची संधीही त्यांनी सोडली