सुधीर मुनगंटीवार यांचे नेमकं असं दुःख काय की नाना पटोले म्हणाले, त्यांच्या दुःखात सामील…
काही जण 'मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' सांगून मुख्यमंत्रीचे उपमुख्यमंत्री झाले. बारामतीपासून भंडारापर्यंत कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. पण मी त्यांना सांगितले की काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे लागतील.
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर ते भंडारापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहे. भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी सांगितले की, त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक आहेत. काही जण ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ सांगून मुख्यमंत्रीचे उपमुख्यमंत्री झाले. बारामतीपासून भंडारापर्यंत कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. पण मी त्यांना सांगितले की काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे लागतील. त्यानंतर हाय कमांडच्या आदेशानेच मुख्यमंत्री बनेल. मात्र, यावर भाजपला एवढे उतावीळ वेळ होण्याचे काही कारण नाही. भाजप सत्तेशिवाय जगू शकत नाही. जनतेच्या पैशाची लुटमार करणे लोकांना जीएसटी सारखा सुलतानी टॅक्स लावून नरेंद्र मोदीच्या सरकार सातत्याने पाप केले आहे. येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या अनेक मंत्री आणि आमदारांची डिपॉझिट जप्त होणार आहे. त्यामुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे दुःख स्वाभाविक आहे. त्यांच्या दुःखात मी सामील आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.