KOLHAPUR NEWS : आधी NO ENTRY, आता ENTRY, हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्याचा काय आहे किरीट सोमया यांचा ‘प्लॅन’?
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कागल येथील घरावर काल ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. सुमारे १४ तासाहून अधिक काळ हसन मुश्रीफ यांची चौकशी चालू होती. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुळे याआधीही 2019 मध्ये हसन मुश्रीफ […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कागल येथील घरावर काल ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. सुमारे १४ तासाहून अधिक काळ हसन मुश्रीफ यांची चौकशी चालू होती. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुळे याआधीही 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. तर, सोमय्या यांनी थेट कोल्हापूरमध्ये जाऊन हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगत मुश्रीफ यांना आव्हान देण्याचा इशारा दिला होता.
मात्र, त्यावेळी राज्यात मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमया यांना कोल्हापूर बंदी करून त्यांच्या मानसुब्यावर पाणी फिरवले होते. आता ईडी आणि आयकर विभागाने मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकल्याने सोमया यांनी पुन्हा कोल्हापुरात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोल्हापूरमध्ये जाऊन ते मुश्रीफ यांना पुन्हा आव्हान देणार आहेत. सोमया पुढील आठवड्यात कोल्हापूरला जाणार आहेत.