Ladki Bahin Yojana 2024 : महिलांच्या धावपळीनंतर ‘लाडकी बहीण योजने’त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?

| Updated on: Jul 03, 2024 | 5:41 PM

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात. त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला. या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली. बघा लाडकी बहीण योजनेतील अटींमध्ये सरकारने कोणता केला बदल?

Follow us on

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात. त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला. या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली. लाडकी बहीण योजनेत सरकारने मोठा बदल केला असून डोमेसाईल सर्टिफिकेट ऐवजी १५ वर्ष जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल तर अडीच लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ जुलैपर्यत शेवटची तारीख होती. पण अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली. बघा लाडकी बहीण योजनेतील अटींमध्ये सरकारने कोणता केला बदल?