Special Report | नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागं कुठलं कनेक्शन? आत्महत्येपूर्वीचा ऑडिओ पोलिसांकडे, काय आहे क्लिपमध्ये?

| Updated on: Aug 04, 2023 | 7:39 AM

Tv9 Marathi Exclusive VIDEO | नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमधील सर्वात महत्त्वाची माहिती, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली, याची कारणं सध्या पोलीस शोधताय पण नाना पटोले यांनी देसाई यांच्या आत्महत्येमागे ठाणे कनेक्शन असल्याचा आरोप केलाय. तर देसाईंच्या आत्महत्येमागं एमएमआर रिजन कनेक्शन? यासह देसाई यांच्या आत्महत्येमागे बॉलिवूडचा मोठा कलाकार? अशा शक्यता काही राजकीय वर्तविल्या आहेत. नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्यात. नितीन देसाई आत्महत्येच्या रात्री बाहेरगावातून मुंबईत आले होते. ते रात्री 12 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते रात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास कर्जतमधील त्यांच्या ND स्टुडिओमध्ये पोहोचले. स्टुडिओमध्ये पोहोचताच आतमध्ये असणाऱ्या एका मंदिरात त्यांनी रात्रीच्या वेळी दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेऊन ते राहत असलेल्या त्यांच्या बंगल्यात गेले. विशेष म्हणजे या बंगल्याचे नाव सलमान हवेली आहे. या हवेलीत अभिनेता सलमान खान अनेक सिनेमांच्या शूटिंगदरम्यान राहायचा. त्यामुळे या हवेलीला त्यांनी सलमान हवेली, असं नाव दिलं होतं. याच हवेलीत सध्या नितीन देसाई यांच वास्तव्य होतं. देसाई यांनी रेकॉर्ड केलेले ऑडिओ आत्महत्येपूर्वीचे नाही तर ते टप्प्यात रेकॉर्ड केलेले आहे, बघा यासंदर्भात एक स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 04, 2023 07:27 AM