आदित्य ठाकरे यांची उंची किती? रामदास कदम यांनी उडविली खिल्ली

आदित्य ठाकरे यांची उंची किती? रामदास कदम यांनी उडविली खिल्ली

| Updated on: Sep 22, 2023 | 12:08 AM

निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब केले आहे. ज्या ज्या वेळे पक्ष बदलले निशाणी बदलल्या त्या त्या वेळी ज्याच्याकडे आमदार खासदार जास्त त्यांना तो पक्ष शिक्कामोर्तब झालेला आहे नवीन काय होणार

खेड : 20 सप्टेंबर 2023 | मुंबईच्या माणसांना मुंबईच्या बाहेर फेकण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. कोकणी माणसाला भिकेला लावलं. आता त्यांच्याकडून भावनात्मक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केलीय. 370 हटवणे आणि राम मंदिर बांधणे ही दोन्ही कामे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील होती. ती पूर्ण केली आहेत. शिवसेना प्रमुखांनी जे मिळवलं हे आयत्या बिळावर नागोबा बसतो तसं बसले. सत्तेच्या मस्तीमुळे सत्ताबदल झाला मुख्यमंत्रीपद गेलं. डोक्यामध्ये हवा गेलेल्यांना एकनाथ शिंदेनी जमिनीवर आणलं. एकनाथ शिंदेनी दोघांना कामाला लावलय बाप पण पळतोय आणि बेटा पण पळतोय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेट सुद्धा घेत नव्हते. पण आता फिरत आहेत. नारायण राणेंच्या विरोधात संघर्ष करत होतो तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते तेव्हा मालवण, कणवलीत कितीवेळा आले. आदित्य ठाकरेंवर बोलण्यापेक्षा मी उद्धव ठाकरेंवर बोलेन. मी बोलाव इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली.

Published on: Sep 22, 2023 12:08 AM