Udhav Thackeray: धनुष्य कोणा हाती? बाण लागणार कोणाला? धनुष्य बाण चिन्हं कोणाला मिळणार, काय म्हणतायेत उद्धव ठाकरे

Udhav Thackeray: धनुष्य कोणा हाती? बाण लागणार कोणाला? धनुष्य बाण चिन्हं कोणाला मिळणार, काय म्हणतायेत उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 08, 2022 | 6:07 PM

Election Symbol News: धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावरुन शिवसेना आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु आहे. काय म्हणतायेत उद्धव ठाकरे

शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडून शिंदेसेनेने सत्ता स्थापन केली आहे. आता ते थेट शिवसेना पक्षाच काबीज करण्यासाठी तयारी करत आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण (Dhanush ban-Bow and arrow) या चिन्हावरुन (Election Symbol) सध्या रणकंदन सुरु असून या रस्सीखेचमध्ये हे निवडणूक चिन्हं मुळ शिवेसेनेला मिळतं की शिंदेसेनेला हे येत्या काळात स्पष्ट होईलच. पण आज उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पदाधिका-यांशी बोलताना धनुष्यबाण हे चिन्हं शिवसेनेपासून कोणीच हिरावून घेऊ शकत नसल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी कायद्याचा आधारही घेतला. तसेच शिवसैनिकांनी चिन्हावरुन चिंता घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. ती चिंता सोडा. धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची ही कुवत जोखवल्या जाते, त्याची लायकी पाहिली जाते, त्या माणसाची चिन्हं कशी आहेत हे तपासले जाते असा खोचक टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचे नाव न घेता लगावला. तसेच धनुष्यबाण हे चिन्हं कोणीही शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही असं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.

Published on: Jul 08, 2022 06:05 PM