हायकमांडने नाना पटोले यांना ‘काय काय’ दिलं ? ‘या’ नेत्याला आक्षेप घेण्याचं कारणच काय ?
चार वर्षात भाजपमध्ये जाऊन नाना पटोले पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. या चार वर्षांत नाना पटोले यांना आठ आठ पदे मिळाली. भाजपमधून आल्यानंतर त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष बनविण्यात आले.
नागपूर : राज्यात काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या वादावर कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मोठे भाष्य केले आहे. काल या वादावर एकसदस्य समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. चार वर्षात भाजपमध्ये जाऊन नाना पटोले पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. या चार वर्षांत नाना पटोले यांना आठ आठ पदे मिळाली. भाजपमधून आल्यानंतर त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष बनविण्यात आले. महाविकास आघाडी सरकार जर टिकले असते तर त्यांना मंत्री पदही मिळाले असते. हायकमांडने त्यांना एक नव्हे दोन नव्हे तर आठ, आठ पदे दिली आहेत. राज्यात जी परिस्थिती चालू आहे तीच परिस्थिती राज्यस्थान आणि छत्तीसगडमध्ये आहे, असे आमदार आशिष देखमुख म्हणाले.
Published on: Feb 17, 2023 06:14 PM
Latest Videos

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
