कपिल सिब्बल यांनी मांडलेली ‘ती’ जमेची बाजू कोणती? आता थेट जखमेवर बोट..! जाणून घ्या ते 10 मुद्दे

| Updated on: Sep 27, 2022 | 5:07 PM

कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाची बाजू लावून धरली होती. शिंदे गटातील आमदारांनी घेतलेली भूमिका पक्षविरोधी कशी आहे हे त्यांनी घटनापीठासमोर मांडले होते.

मुंबई : शिवसेना कुणची यावरुन सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) घटनापीठासमोर मंगळवारी सकाळपासूनच सुनावणीला सुरवात झाली होती. शिंदे गट, शिवसेना आणि निवडणुक आयोगाचे वकील हे आपली बाजू घटनापीठासमोर मांडत होते. दरम्यान, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी शिंदे गटाने घेतलेली भूमिका आणि पक्षाचे आदेश न पाळता विरोधकांशी केलेली हातमिळवणी ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिली आहे. सदस्याच्या अपत्रातेबरोबरच शिवसेना पक्ष (Shivsena Party) प्रमुखांची जबाबदारी काय हे त्यांनी कोर्टासमोर मांडले होते.

  1. व्हिप न पाळल्याने घटनेनुसार सदस्य अपात्र ठरतो
  2. तुम्ही विरोधी पक्षाशी संगनमत करुन पक्षाच्या मात्र, विरोधात वागलात. याचाच अर्थ पक्षाचे सदस्यत्व तुम्ही सोडले असाच होतो.
  3. निवडणुक आयोगाच्या रेकॉर्डनुसार उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख.
  4. 2023 पर्यंत उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख राहणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ही होऊ शकत नाही.
  5. शिंदे अपात्र तरी त्यांना सदस्य मानण्यात येत आहे.
  6. विरोधकांशी हातमिळवणी करुन सरकार कसं पाडू शकतात?
  7. शिंदे शिवेसेनेचा भाग आहे की नाही, हा प्रश्न असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा केला.
  8. त्या आमदारांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे ते पक्षावर दावा करु शकत नाहीत.
  9. त्या शिंदे गटाने नवीन पक्ष काढावा किंवा दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे.
  10. एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नसल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 27, 2022 05:06 PM