Anil Bonde : पीडित तरुणी बोंडेंच्या भेटीला, हैदराबादमधली ती घटना काय?
मुस्लिम पद्धतीनेच हा विवाह करण्यात आला होता. पीडित मुलीने सतर्कतेने आपली सुटका करुन घेतली असून ती खासदार अनिल बोंडे यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आली होती. अनिल बोंडे यांनी पुन्हा पोलिसांवर गंभीर आरोप केले असून या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. लव्ह जिहाद सारखे प्रकार सुरु असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे. तर मेळघाटातील ही तिसरी घटना असल्याचेही ते म्हणाले आहेत.
अमरावती : मेळघाटातील एका (The victim girl) पीडित तरुणीने खासदार अनिल बोंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मेळाघाटात लव्ह जिहादची तिसरी घटना समोर आल्याचा आरोप (Anil Bonde) अनिल बोंडे यांनी केला आहे. सदरील मुलीला अकोट येथील मुस्लीम मुलाने फूस लावून चार महिन्यापूर्वी (Hyderabad) हैदराबादला पळून नेऊन विवाह केला होता. शिवाय मुस्लिम पद्धतीनेच हा विवाह करण्यात आला होता. पीडित मुलीने सतर्कतेने आपली सुटका करुन घेतली असून ती खासदार अनिल बोंडे यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आली होती. अनिल बोंडे यांनी पुन्हा पोलिसांवर गंभीर आरोप केले असून या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. लव्ह जिहाद सारखे प्रकार सुरु असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे. तर मेळघाटातील ही तिसरी घटना असल्याचेही ते म्हणाले आहेत.
Published on: Sep 11, 2022 08:27 PM
Latest Videos