2 हजाराची नोट बंद होणार, तुळशीबागेतल्या व्यापारांची काय परिस्थिती?
2 हजाराच्या नोटा बाद झाल्याने देशातील नागरिकांना टेन्शन आले आहेत. बाजारात अनेक ठिकाणी आता दोन हजार रुपयांचा नोटा स्वीकारल्या जात नाही आहेत.सरकारने सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांतून बदलून घेता येईल असं सांगितलं असलं तरी अनेक व्यापारी भीतीपोटी या नोटा स्वीकारत नाही आहेत.
पुणे : शुक्रवारी मोदी सरकारने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या काळातील नोटाबंदीचा हा दुसरा निर्णय आहे. देशभरात या निर्णयाची चर्चा सुरू झाली. 2 हजाराच्या नोटा बाद झाल्याने देशातील नागरिकांना टेन्शन आले आहेत. बाजारात अनेक ठिकाणी आता दोन हजार रुपयांचा नोटा स्वीकारल्या जात नाही आहेत.सरकारने सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांतून बदलून घेता येईल असं सांगितलं असलं तरी अनेक व्यापारी भीतीपोटी या नोटा स्वीकारत नाही आहेत. परंतु नोटाबंदीच्या निर्णयाचा तुळशीबागेमधील मार्केटवर काहीही परिणाम झाला नसल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलय. तुळशीबाग मार्केटमध्ये व्यापारी आजही या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारताना दिसत आहेत. आमच्या व्यापारावर अजून तरी कसलाही परिणाम झाला नसून 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारू असे स्पष्टीकरण तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी दिले आहे.