राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? शिंदे गटांच्या आमदाराने थेट सांगितले जागावाटपाचे सूत्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? शिंदे गटांच्या आमदाराने थेट सांगितले जागावाटपाचे सूत्र

| Updated on: Jan 17, 2023 | 3:53 PM

जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार येऊन सात महिने झाले आहेत. सरकारच्या मंत्रिमंडळात २० जण असून अजूनही २२ जागा रिक्त आहेत. यातच शिंदे गटातून अनेकांना मंत्रिपदाचे वेध लागले आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात टीव्ही ९ माहिती देताना जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे.

या विस्तारातही रिक्त असलेल्या सर्व २२ जागा भरल्या जाणार नाही. केवळ १० जागा भरल्या जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजीनाट्य होऊ नये म्हणून फक्त १० जागा भरल्या जाणार आहेत. आताच्या विस्तारात ८ जणांना राज्यमंत्री केले जाणार आहे. त्यात दोन जणांना कॅबिनेट मंत्री केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.