धनंजय मुंडे मुलीला प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगतात तेव्हा...

धनंजय मुंडे मुलीला प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगतात तेव्हा…

| Updated on: Jan 26, 2023 | 8:42 AM

आदिश्री हिनेही आपल्या वडिलांचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले आणि त्यानंतर मुंडे यांनी आपल्या मुलीचा गोड 'पापा' घेतला.

बीड : राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे ( dhananajay munde ) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर ते आता घरी विश्रांती करत आहेत. कुटुंबियांसमवेत ते आपला वेळ व्यतीत करत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांची मुलगी आदिश्री हिला धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावून सांगितले. आदिश्री हिनेही आपल्या वडिलांचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले आणि त्यानंतर मुंडे यांनी आपल्या मुलीचा गोड ‘पापा’ घेतला. हा व्हिडिओ नक्की पहा..

Published on: Jan 26, 2023 08:42 AM