यंदा मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली बातमी
एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उकाडा पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. पाऊस कधी पडणार याची वाट नागरिक बघत आहेत. दरम्यान हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे.
पुणे : एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उकाडा पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. पाऊस कधी पडणार याची वाट नागरिक बघत आहेत. दरम्यान हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदा महाराष्ट्रात 6 जूनला मान्सून दाखल होणार आहे. त्यानुसार मुंबईत यंदा 10 किंवा 11 जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.तर केरळमध्ये 4 जून रोजी येणार आहे. दरवर्षी 1 जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो, मात्र यंदा पाऊस 2 ते 3 दिवस लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवला असून मॉन्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.