Special Report | 2024 ऐवजी लोकसभा निवडणूक यंदाच लागणार? बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी वर्तवली शक्यता…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्य तसेच देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान वेळेनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. मात्र सर्व पक्षांची ज्यापद्धतीने तयारी सुरु आहे, ते पाहून लोकसभा याच वर्षी लागणार का याची चर्चा रंगत आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्य तसेच देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान वेळेनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. मात्र सर्व पक्षांची ज्यापद्धतीने तयारी सुरु आहे, ते पाहून लोकसभा याच वर्षी लागणार का याची चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक याच वर्षी ऑक्टोबरला लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील लोकसभा निवडणूक याच वर्षी होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात भाजप, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जर लोकसभेला एका वर्षाचा अवकाश आहे तर सर्वच पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला का लागले आहेत? यावर्षी काही राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्याही निवडणुका लागतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच लोसकभेच्या दृष्टीने कोणाची काय तयारी सुरु आहे, यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट….