संजय राऊत यांनी भाजपला करून दिली ‘त्या’ पोटनिवडणुकीची आठवण, म्हणाले ती परंपरा
विधान परिषद निवडणुकीत आता ज्या प्रकारचे निर्णय आले ते पाहून सरकार घाबरले आहे. कसबा आणि चिंचवड येथे पराभव होईल याची त्यांना धास्ती वाटत आहे.
मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर तुम्ही मागे हटा असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजपने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली. कॉंग्रेसने कसबा पेठमध्ये आपला उमेदवार जाहीर केला आहे. चिंचवड जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आमच्यात जो काही निर्णय होईल आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत राहू. विधान परिषद निवडणुकीत आता ज्या प्रकारचे निर्णय आले ते पाहून सरकार घाबरले आहे. कसबा आणि चिंचवड येथे पराभव होईल याची त्यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन ते करत आहेत. ही परंपरा आहे असे सांगताहेत, मग ही परंपरा नांदेड आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत कुठे गेली होती, असा सवालही राऊत यांनी भाजपला केला. काही झाले तरी ही निवडणूक होणारच असे त्यांनी स्पष्ट केले.