Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात नेमकं दडलयं काय?

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात नेमकं दडलयं काय?

| Updated on: Sep 17, 2022 | 8:45 PM

मिशन विदर्भ असे या दौऱ्याला संबोधले जात आहे. पक्ष वाढीबरोबरच पक्षातील अंतर्गच मतभेद मिटवण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भात पक्षाची कशी वाटचाल राहणार याअनुषंगाने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत

मुंबई :  (Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हातावरील शस्त्रक्रियेनंतर प्रथमच पाच दिवसांच्या (Vidarbha) विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. शनिवारी सीएसएमटीवरुन सायंकाळी ते नागपूरकडे रवाना झाले आहेत. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी त्यांचा दौरा असणार आहे. शिवाय दरम्यानच्या काळात (MNS Party) पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि सभाही होणार आहेत. मिशन विदर्भ असे या दौऱ्याला संबोधले जात आहे. पक्ष वाढीबरोबरच पक्षातील अंतर्गच मतभेद मिटवण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भात पक्षाची कशी वाटचाल राहणार याअनुषंगाने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील पुढील तीन दिवस याच विभागात असणार आहेत. यामध्ये अतिवृष्टीने शेतीपिकाचे झालेले नुकसान तर पाहणार आहेतच पण पक्ष बांधणीसाठी शिवसैनिकांच्या भेटीगाठीही घेणार आहेत.

Published on: Sep 17, 2022 08:45 PM