Chandrashekhar Bawankule : Jitendra Awhad यांच्यावर आरोप करताना बावनकुळे यांचं काय वक्तव्य?

Chandrashekhar Bawankule : Jitendra Awhad यांच्यावर आरोप करताना बावनकुळे यांचं काय वक्तव्य?

| Updated on: Jan 04, 2023 | 5:21 PM

बावनकुळे यांच्याकडून आव्हाड यांच्यावर टीका होत असतानाच भर पत्रकार परिषदेत औरंगजेबला औरंगजेबजी असं म्हटलं गेलं. त्याचबरोबर आव्हाड हे खोटी प्रसिद्ध घेण्यासाठी औरंगजेबजीला ते क्रूर मानत नाहीत. असेही आव्हाडांवर आरोप केला आहे.

मुंबई : राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्यानंतर आता भाजप देखिल अडचणीत येण्याची शक्याता आहे. भाजप देखिल संघटनाच्यांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. भाजपचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून औरंगजेबचा औरंगजेबजी असा उल्लेख झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून भाजपने त्यांनी घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलने केली. तसेच टीका देखिल केली. त्यामुळे आधी आव्हाड आणि आज अजित पवार यांना माध्यमांच्या समोर येत आपली बाजू मांडावी लागली.

याचदरम्यान आज बावनकुळे यांच्याकडून आव्हाड यांच्यावर टीका होत असतानाच भर पत्रकार परिषदेत औरंगजेबला औरंगजेबजी असं म्हटलं गेलं. त्याचबरोबर आव्हाड हे खोटी प्रसिद्ध घेण्यासाठी औरंगजेबजीला ते क्रूर मानत नाहीत. तर इकडे राधे राधे म्हणणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात असेही बावनकुळे म्हणाले.

Published on: Jan 04, 2023 04:55 PM