Special Report | उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटाला आव्हान, म्हणाले, ‘मर्दाची अवलात’

Special Report | उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटाला आव्हान, म्हणाले, ‘मर्दाची अवलात’

| Updated on: Jul 11, 2023 | 10:26 AM

याचदरम्यान नागपूर येथील मेळाव्यात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व हे बगल मे छूरा सारखे असल्याची टीका केली.

मुंबई : उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गेले दोन दिवस ते यवतमाळ आमरावती आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेलावे घेत आहेत. याचदरम्यान नागपूर येथील मेळाव्यात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व हे बगल मे छूरा सारखे असल्याची टीका केली. त्याचवेळी भाजपला आता सत्तेची मस्ती चढल्याचेही टीका त्यांनी केली. तर फडणवीस हे नागपूरला कलंक असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. यावरून सध्या राज्यात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपकडून यावरून पलटवार करण्यात येत आहे. यावेळी ठाकरे यांनी मर्दाची अवलात असाल तर सगळ्या यंत्रणा बाजूला ठेवून मैदानात या असे आव्हान केलं होतं. ज्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना मर्दांचा पक्ष असेल तर वरळीतून पुन्हा आदित्यला निवडून आणा असा टोला लगावला आहे. सध्याच्या भाजप आणि ठाकरे यांच्यात रंगलेल्या सामान्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 11, 2023 10:26 AM