‘भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही’; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

‘भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही’; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

| Updated on: Jul 09, 2023 | 3:23 PM

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना, सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही तेच आता विदर्भ दौऱ्यावर येत आहेत अशी टीका केली होती.

यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते यवतमाळमध्ये पोहरादेवीचे दर्शन घेतल्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना, सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही तेच आता विदर्भ दौऱ्यावर येत आहेत अशी टीका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी, जाऊ द्या ओ सोडा, आता बाजप काही बोलण्याचा लायकीचा राहिलेला नाही. त्यांनी दुसऱ्यावर दोषारोप करणे सोडून द्यावं. तसेच भाजपने आता घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांना सांभाळावं असं ठाकरे यांनी भाजपला सल्ला दिला आहे.

Published on: Jul 09, 2023 03:23 PM