भाषणा दरम्यान असं काय झालं की पंकजा मुंडे यांना थांबावं लागलं? कार्यकर्ता का ताडकन उठला?
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दोनच दिवसांपुर्वी व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मनात भाजपविरोधात खदखद असल्याचे बोलले जात होते. याचदरम्यान काल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. येथेही पंकजा मुंडे यांची तोफ धडाडली.
बीड : ‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर जाईन ऊस तोडायला,’ अशा भावना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दोनच दिवसांपुर्वी व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मनात भाजपविरोधात खदखद असल्याचे बोलले जात होते. याचदरम्यान काल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. येथेही पंकजा मुंडे यांची तोफ धडाडली. मात्र याचदरम्यान भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्यामुळे त्यांनी त्यांचे भाषण थांबवावं लागलं. तसेच त्याने जी मागणी केली त्यामुळे आता पुढे काय बोलावं असाच प्रश्न पडला होता. या कार्यकर्त्याने मुंडे यांनी स्वत:चा पक्ष काढावा अशी मागणी केली. तसेच जो पर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही तोपर्यंत आम्हाला धीर देऊ शकत नाही. त्यावर पंकजा मुंडे यांनी ठीक आहे… ठीक आहे… तुम्ही एवढी काळजी करू नका… असं म्हटलं. त्यानंतर पुन्हा त्या कार्यकर्त्याने दुसरा आग्रह धरत थेट सभामंडपच सोडला… पहा काय झालं कार्यक्रमात..