फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवार यांनी उडवली खिल्ली! म्हणाले, ‘चाईल्डिश वक्तव्यावर काय बोलायचं?’
उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार हे मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकासाठी या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या आहेत. त्यावरून नागपूरमध्ये आशिष देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी देवेंद्रे फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती.
मुंबई : राज्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधल्यानंतर आता तशीच मोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय पातळीवरून बांधली जात आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार हे मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकासाठी या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या आहेत. त्यावरून नागपूरमध्ये आशिष देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी देवेंद्रे फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्यांनी मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाही. मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चाईल्डिश वक्तव्य असं म्हटलं आहे. तर “राजकारणात अजूनही पोरकट वक्तव्यं करणारा एक वर्ग आहेच, असं म्हटलं आहे. तर चाईल्डिश जे वक्तव्य करतात त्यावर काय बोलायचं?.” असा प्रश्न करत पवार यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.