‘नरेंद्र मोदी वाघाप्रमाणे…’, फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘कितीही जनावरं….’
आशिष देशमुख यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात जबरदस्त राजकिय टोले बाजी पहायला मिळाली. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवताना टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघाप्रमाणे असल्याचं सांगत विरोधकांचा जनावरं असा उल्लेख केला.
नागपूर : काँग्रेसमधून आशिष देशमुख यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात जबरदस्त राजकिय टोले बाजी पहायला मिळाली. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवताना टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघाप्रमाणे असल्याचं सांगत विरोधकांचा जनावरं असा उल्लेख केला. त्यावरून आता राजकारण तापलेलं आहे. केंद्रीय पातळीवरून विरोधकांनी मोदी यांच्याविरोधात मोट बांधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढे येत गाठिभेटी सुरू केल्या आहेत. तर येत्या लोकसभा निवडणुकासाठी रणनीती आखली जात आहे. त्यावरून फडणवीस यांनी जोरदार टीका केली. त्यांनी मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाही. मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. ते पाटण्याला रॅली करणार आहेत. फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही गेलात तर अशीच रॅली 2019 मध्येही झाली होती. हातात हात घालून फोटो काढले होते. मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या निवडून आल्या नाहीत. मंचावर 55 लोक होते आणि काँग्रेसच्या 48 जागा निवडून आल्या होत्या.