भाजपसोबत युती तोडली, नातं टिकवावे, उद्धव ठाकरे यांना कुणी दिला हा सल्ला ?

भाजपसोबत युती तोडली, नातं टिकवावे, उद्धव ठाकरे यांना कुणी दिला हा सल्ला ?

| Updated on: Feb 13, 2023 | 8:12 AM

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत युती करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन केली. याची आठवण करून देत सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : भाजपसोबत २५ वर्षांची असलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत युती करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन केली. याची आठवण करून देत सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना आपले नाते घट्ट करायला आलो आहे असे विधान केले. त्यावरून मुनगंटीवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशासोबत नाते घट्ट करावे. उत्तर भारतीय यांच्यासोबत नाते टिकवावे. त्याला आक्षेप असण्याचे कारण काय ? त्यांनी नाते टिकवावे, घट्ट करावे, मात्र कुणाचा विश्वासघात मात्र कधी करू नये असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

Published on: Feb 13, 2023 08:12 AM