प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण? पाहा काय म्हणाले...

प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण? पाहा काय म्हणाले…

| Updated on: Oct 01, 2023 | 10:20 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे आणि आमच्या मार्गामध्ये दोन भटजी आडवे येत आहेत असा टोला लगावला. जोपर्यंत ते तारीख देत नाहीत तोपर्यंत आम्हाला थांबावे लागेल असे ते म्हणालेत.

बुलढाणा : 1 ऑक्टोंबर 2023 | शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युती केली आहे. आंबेडकर यांनी ठाकरे यांच्यासोबत युती केली असली तरी इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा समावेश झालेला नाही. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. तसेच, आदित्य ठाकरे यांना इतिहास माहित नसेल तर त्यांनी बोलू नये, असा सल्लाही दिलाय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमचे बोलणे झाले, साखरपुडा झाला आहे. पण, लग्नासाठी दोन भटजी अडथळे आणतायत असा टोला त्यांनी लगावला. हे दोन भटजी म्हणजे एक कॉंग्रेस आणि दुसरा राष्ट्रवादी आहे. ते जोपर्यंत तारीख काढत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावे लागेल असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Published on: Oct 01, 2023 10:20 PM