Parbhani : अन् सत्तार व्यासपीठ सोडून फोनवरील प्रश्नांची उत्तरे देत होते, परभणीच्या सभेतील ‘तो’ ड्रामा काय?
सभेसाठी पोषक वातावरण आणि जनतेची मोठी गर्दी असल्याचे सत्तारांनी सांगितले होते. तर तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या असे म्हणताच त्यांनी मोबाईल हा स्पिकरवर टाकला होता.
नजीर शेख प्रतिनीधी, परभणी : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा चर्चेत आले आहेत. परभणी दौऱ्यावर असताना सुरवातीला शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी त्यांचा ताफा अडविला होता. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) मागण्या समजावूनही घेतल्या. मात्र, कृषी मंत्र्यांनी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकूण घेऊन सभेसाठी अब्दुल सत्तार हे मार्गस्थ झाले.या ठिकाणीही भर सभेत त्यांना चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचाच फोन आला. फोनवर बोलत असतानाच सत्तार यांनी परभणी येथे सभा घेत असल्याचे सांगितले. यावरुन मुख्यमंत्र्यांनी सभेला गर्दी आणि वातावरण कसे असेही विचारले असावे, त्यानुसार सभेसाठी पोषक वातावरण आणि जनतेची मोठी गर्दी असल्याचे सत्तारांनी सांगितले होते. तर तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या असे म्हणताच त्यांनी मोबाईल हा स्पिकरवर टाकला होता. अवघ्या 1 मिनिटांच्या या कॉंलची पुन्हा मोठी चर्चा रंगली होती.