उद्धव ठाकरे यांचा पुढील निशाणा कुणावर ? काय म्हणाले पहा, साजन पाचपुते यांना दिले उपनेतेपद

उद्धव ठाकरे यांचा पुढील निशाणा कुणावर ? काय म्हणाले पहा, साजन पाचपुते यांना दिले उपनेतेपद

| Updated on: Sep 04, 2023 | 8:45 PM

भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी साजन यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी दिली. तसेच आपले पुढील लक्ष्य कोणते हे भाषणात सांगितले.

मुंबई : 4 सप्टेंबर 2023 | साजन पाचपुते यांनी निश्चय करून सहकुटुंब शिवसेनेत आलात. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला असेल आणि तो आलाच पाहिजे. अनेकांचे डोळे पांढरे झाले असतील, ते झालेच पाहिजे… नाही झाले तर काय फायदा. त्या पांढऱ्या डोळ्यांना भगव्याचं तेज आपल्याला दाखवायचं आहे. सगळे उपरे एकमेकांच्या उरावर बसलेत. तुम्हाला उपनेतेपदाची जबाबदारी देत आहे. महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. जालन्यात बेछूट लाठीचार्ज केला. तिथे जाऊन पाहिलं. आपलं पण सरकार होतं, पण, तेव्हा लाठीचार्ज झाला का. बारसुला देखील असाच लाठीचार्ज केला, वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. हम करे सो कायदा अशा सरकारला तोडून मोडून टाकायचं आहे. शेतकऱ्यांना मदत करायची नाही, पक्ष फोडायचा… कोणी आंदोलन करत असतील तर त्यांना मारायचं हे या सरकारचं काम आहे, अशी टीका शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Published on: Sep 04, 2023 08:45 PM