लाठीचार्जचे आदेश देणारा तो जनरल डायर कोण? माजी गृहमंत्री यांनी घेतले 'या' नेत्याचे नाव

लाठीचार्जचे आदेश देणारा तो जनरल डायर कोण? माजी गृहमंत्री यांनी घेतले ‘या’ नेत्याचे नाव

| Updated on: Sep 07, 2023 | 7:34 PM

ओबीसी समाजावर अन्याय झाला तर सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. अशी वेळ ओबीसी समाजावर येऊ नये. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवून द्यावी, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते टाकणारं नाही, कुणबी नाराज होतील. सरकारने यातून मार्ग काढावा.

नागपूर : 7 सप्टेंबर 2023 | जालना येथे झालेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला जनरल डायरची उपमा दिली. तसेच, लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून गेल्याचा आरोपही केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा राजकारण सोडा असे आव्हान विरोधकांना दिले. तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावर पलटवार केला आहे. मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश हा गृहमंत्री यांनीच दिला, हे आंदोलन चिरडून टाका असे आदेश दिले गेले. त्यामुळे जनरल डायर कोण हे कळलं पाहिजे, यासाठी निवृत्त न्यायाधीशमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी गृहमंत्री म्हणून खात्रीपूर्वक सांगतो की गृहमंत्रालयातून आदेश गेले. कोणताही sp याला लाठीचार्ज आदेश देता येत नाही. तसे करता येत नाही. हे आंदोलन चिरडून टाका असे आदेश गृहमंत्री यांनी दिले. म्हणून कोणी फोन केला याची चौकशी झाली पाहिजे, म्हणाले.

Published on: Sep 07, 2023 07:34 PM