मनोज जरांगे यांचा स्क्रिप्ट रायटर कोण? भाजपचा सवाल, पण टार्गेट मात्र नेमकं कोण?
काल परवा तुमच्या बाजूला बोलत होतो आम्ही. तुम्ही निर्णय घ्या कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका. त्यांना दुसरं काय आलं आयुष्यात? एवढंच केलं कोण टार्गेट केलं. भाजप तुमच्यामुळंच संपायला लागलाय ना मग? कशामुळं संपायला लागलंय? रिवर्स कशामुळं आलेत इतक्या राज्यात? हे असले नमुने आहेत ना? बढाया आणणारे?
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेते आक्रमक झालेत. फडणवीस यांनी बीडमध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केलं गेल्याचं विधान केलं. त्यावर जरांगे पाटलांनी फडणवीसांना लक्ष केलं. मात्र जरांगेचा स्क्रिप्ट रायटर कोण? असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. काही लोकांनी लोकप्रतिनिधींचे घरं जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर ही कारवाई अत्यंत चुकीची आहे असे फडणवीस म्हणाले. त्यावर जरांगे पाटील यांनी एवढंच कोण टार्गेट केलं? कोणाची गरज आहे? कशाला बोलता मग आम्हाला? असे सवाल केलेत. जी कारवाई केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामील असल्याचं लक्षात येतंय. त्याची अतिशय गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली आहे. अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृहविभाग कडक कारवाई करेल असे म्हणाले. मात्र कोण कोणाला टार्गेट करत आहे हा प्रश्न आहे.