Kishori Pednekar : धोकेबाज कोण, जनतेला सर्वकाही ज्ञात, पेडणेकरांच्या निशाणावर भाजप पक्ष

Kishori Pednekar : धोकेबाज कोण, जनतेला सर्वकाही ज्ञात, पेडणेकरांच्या निशाणावर भाजप पक्ष

| Updated on: Sep 05, 2022 | 5:55 PM

धोके आणि खोके कोणी कोणाला दिले हे सर्व माहित असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. शिवाय मुंबईत शिवसेनेची प्रेमाची दहशत आहे. याची बरोबरी भाजपाला येणार नाही. शिवसेना आणि मुंबई हे नातं वेगळे आहे. ते एका दिवसाच्या आशा आरोपाने तुटणारे नसल्याचेही पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई : शिवसेनेनेच भाजपाला धोका दिल्याचा आरोप (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. अमित शाह हे गणेश उत्सावाच्या निमित्ताने मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी (Shivsena) शिवसेनेला टार्गेट केले असून आगामी महापालिका निवडणूकांमध्ये मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर शिवसेनेने भाजपाला धोका दिला आहे. आणि राजकारणात धोका देणाऱ्यांना माफी नाही असे म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र केले आहे. तर धोके आणि खोके कोणी कोणाला दिले हे सर्व माहित असल्याचे (Kishori Pednekar) किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. शिवाय मुंबईत शिवसेनेची प्रेमाची दहशत आहे. याची बरोबरी भाजपाला येणार नाही. शिवसेना आणि मुंबई हे नातं वेगळे आहे. ते एका दिवसाच्या आशा आरोपाने तुटणारे नसल्याचेही पेडणेकर म्हणाल्या.

Published on: Sep 05, 2022 05:55 PM