कोण ‘हा’ खासदार ज्याने एकाच वाक्यात नितेश राणे यांची उडविली खिल्ली, ‘शी’… ‘शी’… त्याच्यावर अजिबात…
निवडणुका जेव्हा संपन्न होतात त्यामधल्या प्रक्रिया, निकालापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयुक्तांचा संबंध असतो. त्यानंतरच्या प्रक्रियेत ते येत नाहीत. निकालाचे सर्टिफिकेट त्यांनी एकदा दिलं की त्यांचं काम संपते.
मुंबई : जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा दोन्ही सभागृहाना एकत्र बसून संयुक्त मार्गदर्शन माननीय राष्ट्रपती करतात. देशाचे प्रमुख नागरिक म्हणजे राष्ट्रपती. सुदैवानं महिला आहेत. त्यातून दलित भगिनी आहेत. त्यांचा आदर करण्याची नामी संधी असताना देशाचे पंतप्रधान संसदेचे उद्घाटन करतात तेव्हा देशाच्या लोकशाहीलाच आव्हान दिल्यासारखं आम्हाला वाटतं. त्यांचा मान राखला गेला पाहिजे होता. त्यांना निमंत्रण दिले नाही. देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान केला जातोय त्यासाठी आम्ही बहिष्कार टाकत आहोत.
निवडणुका जेव्हा संपन्न होतात त्यामधल्या प्रक्रिया, निकालापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयुक्तांचा संबंध असतो. त्यानंतरच्या प्रक्रियेत ते येत नाहीत. निकालाचे सर्टिफिकेट त्यांनी एकदा दिलं की त्यांचं काम संपते. त्यातूनही काही आव्हानत्मक असेल तर संबंध येतो. विधानसभा अध्यक्ष कायदे तज्ञ आहेत. त्यांना सर्व माहिती आहे. पण, हे सर्व वेळ काढूपणाचे लक्षण आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. त्याच्या अगोदर त्यांचा पक्षच नव्हता. त्या अगोदर मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख होते. त्याचे सुनील प्रभू प्रतोद होते. प्रतोद यांच्या माध्यमातून पक्षादेश कळवला. त्यांनी उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय. नितेश राणे कोण ? ‘शी’… ‘शी’… त्याच्यावर मी अजिबात बोलत नाही, अशा एकाच वाक्यात त्यांनी राणे यांची खिल्लीही उडवली.