Special Report | शिवसेनेच्या शाखा, सेनाभवन कुणाच्या मालकीचं? शिवसेना भवनाचा याआधीचा मूळ मालक उमरभाई नावाचा एक मुस्लिम व्यक्ती होता
शिवसेनेच्या शाखांची नोंदणी किंवा त्यांची मालकी नेमकी कुणाच्या नावावर आहे. शिवसेनेच्या सर्व शाखा या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. शिवाई ट्रस्टचं मुख्य कार्यालय दादरच्या शिवसेना भवनातच असून आणि या शिवाईचे ट्रस्टी म्हणून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत, दिवाकर रावतेंसह इतर काही मंडळी आहेत.
मुंबई : शिवसेना शाखेत(shiv Sena Shakha) फोटो लावण्यावरुन झालेला हा वाद शाखा कुणाची यापर्यंत गेला होता. शिवसैनिकांनी शिंदेचा फोटो लावण्यावरुन विरोध केला आणि दोन गट एकमेकांना भिडले. सध्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. पक्षावर मालकी कुणाची यासाठी कोर्टात लढाई सुरु आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे, की या शिवसेना शाखा आणि शिवसेना भवन(Shiv Sena Bhavan) यावर हक्क कुणाचा असणार. शिवसेना कुणाची, आमदार-खासदार कुणाचे हा मुद्दा जरा बाजूला ठेवा. मात्र शाखा आणि शिवसेना भवन कुणाचं, या प्रश्नाचा जर विचार केला.
तर फक्त शिवसेना शाखांच्या जागा एकत्र केल्या, तर त्या जागांची किंमत डोळे विस्फारणारी ठरु शकते.दादरच्या खेडगल्लीतली शाखा जी कधीकाळी दिवाकर रावतेंनी स्थापन केली होती. आज घडीला फक्त या शाखेच्या जागेची किंमत सव्वा दोन कोटींहून जास्त आहे.
वरळी नाक्यावरच्या 400 चौरस फुटाच्या या शाखेची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. शाखा या शिवसेनेचं मूळ आहे., आणि शिवसेना भवन मुख्य कार्यालय.. भविष्यात शिवसेना कुणाची असेल, याचा फैसला होईलच. मात्र शिंदे गट शिवसेना भवन, मातोश्रीसहवर दावा सांगेल.
अशी आरोप संजय राऊतांनी केला होता.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवसेनेच्या शाखांची नोंदणी किंवा त्यांची मालकी नेमकी कुणाच्या नावावर आहे. शिवसेनेच्या सर्व शाखा या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. शिवाई ट्रस्टचं मुख्य कार्यालय दादरच्या शिवसेना भवनातच असून आणि या शिवाईचे ट्रस्टी म्हणून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत, दिवाकर रावतेंसह इतर काही मंडळी आहेत.
शिवसेनेतल्या पदांची रचना बघितली तर सर्वात आधी शिवसेनाप्रमुख, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख, नेते, उपनेते, विभागीय नेते, विभागप्रमुख,
उपविभागप्रमुख आणि त्यानंतर शाखाप्रमुखाचा नंबर येतो. पण शाखाप्रमुखाला महत्व यासाठी आहे, की शिवसेनेचे आजी-माजी अनेक नेते आज ज्या ही पदावर आहेत, त्यांची सुरुवात फक्त एकनाथ शिंदेच नव्हे तर रामदार कदमांची राजकीय सुरुवात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून झाली. छगन भुजबळ सुद्धा शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. मनोहर जोशींचं राजकारण शाखेतूनच सुरु झालं. प्रमोद नवलकरही सुरुवातीला शाखाप्रमुख राहिले. आत्ता शिवसेनेचे सरचिटणीस असलेले मिलिंद नार्वेकर सुद्धा पहिल्यांदा शिवसेनेचे शाखाप्रमुख होण्यासाठी राजकारणात आले. हे शिवसेना भवन सुद्धा शिवाई ट्रस्टच्या मालकीचं आहे. आणि दैनिक सामना ही ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे
1974 साली शिवसेना भवनाची सुरुवात झाली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र शिवसेना भवनाची याआधीचा मूळ मालक उमरभाई नावाचा एक मुस्लिम व्यक्ती होता. दादर स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि शिवाजी पार्कातून १ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या जागेवर याआधी काही गाळे सुद्दा होते. उमरभाईकडून शिवाई ट्रस्टनं ही जागा खरेदी केली. तिथल्या दुकानदारांना शिवसेना भवनातच काही गाळे दिले गेले. शिवसेनेचं मुख्य कार्यालय असणाऱ्या या जागेची आजची किंमत ४०० कोटींहून जास्त आहे.
शिवसेना कुणाची यावरुन जितका वाद होतोय., तितकाच वाद यापुढे शिवसेना शाखांवरुन ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये
रंगू शकतो. डोंबिवलीत त्या वादाची झलकही दिसली. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डातल्या लोकांसाठी अडी-नडीला मदतीला धावणारी
संस्था म्हणजे शिवसेनेची शाखा असं म्हटलं जातं. मात्र डोंबिवलीतल्या राड्यानंतर त्याच शाखेभोवती पोलिसांना पहारा द्यावा लागला. या फक्त शिवसेनेच्या दोन शाखा झाल्या आणि अश्या फक्त मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डातल्या शिवसेनेच्या शाखांची गोळाबेरीज
केली, तर एकूण शाखांचा आकडा 482 वर जातो.