दिशा सालियनआणि सुशांतसिंग यांची हत्याच, राणेंचा मोठा दावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिशा सालियन प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केलेत. दिशा सालियनवर (Disha Salian) बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या (Sushant Singh) इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत आपल्या जहाल वाकबाणांनी घायाळ करून सुरू ठेवले आहे. आता त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केलेत. दिशा सालियनवर (Disha Salian) बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या (Sushant Singh) इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील ८ जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला.