विधानसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? शिवसेना नेत्याने स्पष्टच सांगितले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणूक कॉंग्रेस लढणार असल्याचे सांगितले आहे. यावरून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पिपंरी चिंचवड आणि कसबा पेठ या दोन जागा कोण लढवणार हे स्पष्टच सांगितले आहे.
रत्नागिरी : नाना पटोले ( nana patoel ) हे एका पक्षाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहे. त्यांचे विधान गांभीर्याने घ्यायला हवे. पण, राज्यात आपली महाविकास आघाडी आहे. पुणे येथील कसबा आणि पिपंरी चिंचवड अशा दोन जागांवर निवडणूक होत आहे. मात्र महाविकास आघाडीत तीन पक्ष आहे.
त्यामुळे कोणती जागा कोण लढविणार याचा निर्णय महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत होईल. तीन पक्ष एकमताने ठरवून जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे तो तो पक्ष ती जागा लढवेल असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
Published on: Jan 27, 2023 08:32 AM
Latest Videos