पुणे लोकसभेच्या जागेवरून घमासान; नाना पटोले विरुद्ध अजित पवार वाद रंगला; पोटनिवडणूक नक्की कोण लढवणार?
पुणे लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला तिढा काही सुटत नाही आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जागेचा आग्रह धरला आहे तर काँग्रेस मात्र जागा सोडायला तयार नाही आहे.
पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच ही पोटनिवडणूक लागली तर मविआमधून या जागेवर कोण उभं राहणार, याची चर्चा सुरु झाली आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जागेचा आग्रह धरला आहे, तर काँग्रेस मात्र जागा सोडायला तयार नाही आहे. पुण्याच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. पुणे लोकसभेचा इतिहास पाहिला तर इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असून ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तर मेरीटच्या आधारावर काँग्रेसच लढणार, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यातच काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत आपणच जागेवर जिंकू असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणुक लागली तर मविआच्या वतीने कोण लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…