Special Report | कोकणातील तिप्पट भाडेवाढीला कोण आवर घालणार?
गणेशोत्सवाासाठी मुंबईकर कोकणासह राज्यभरातल्या गावी परततायत. मात्र सणाचं आणि गर्दीचं निमित्त साधून ट्रॅव्हल्सचालकांनी लूट माजवलीय. एकवेळ सणासुदीला काही प्रमाणात जरी ग्राह्य धरली, तरी अनेक ठिकाणी तब्बल ३ ते ४ पटीनं भाडं आकारलं जातंय.
बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरलेत आणि कोकण वासियांची ओढ गावाला जाण्यासाठी झालेली आहे. गणेशोत्सवात लाखो प्रवासी मुंबईतून कोकणाच्या दिशेने जात असतात परंतु ह्या प्रवाशांची लूट खाजगी वाहतूकदारांकडून होत असते गणेशोत्सव आणि शिमगा या दोन्ही सणाला कोकणात जाणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून तिकीट दरांमध्ये दुपटीने आणि तिपटीने वाढ केली जाते आणि असुरक्षितपणे संपूर्ण प्रवास केला जातो त्यामुळे जीव टांगणीला ठेवून खाजगी वाहतूकदारांकडून हा जीवघेणा प्रवास केला जातो.
गणेशोत्सवाासाठी मुंबईकर कोकणासह राज्यभरातल्या गावी परततायत. मात्र सणाचं आणि गर्दीचं निमित्त साधून ट्रॅव्हल्सचालकांनी लूट माजवलीय. एकवेळ सणासुदीला काही प्रमाणात जरी ग्राह्य धरली, तरी अनेक ठिकाणी तब्बल ३ ते ४ पटीनं भाडं आकारलं जातंय.
कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्याची आधीच दुर्दशा झालीय. त्यात खासगी बसेसमध्ये वाढीव पैसे घेऊन अधिकचे प्रवासी बसवले जातायत. सरकारनं गणेशोत्सवासाठी टोलमाफी केली असली, किंवा विशेष रेल्वे सोडल्या असल्या., तरी खासगी चालकांकडून होणाऱ्या लुटीकडेही लक्ष घालण्याची मागणी होतेय.