काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून कोणाचा अर्ज; माणिकराव ठाकरेंनी दिली माहिती
आज काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सध्या अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
नवी दिल्ली : आज काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सध्या अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सुरुवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत (Ashok Gehlot) हेच काँग्रेसचे अध्यक्ष होणार असं मानलं जात होतं. मात्र त्यांनी आता या निवडणुकीतून माघात घेतली आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आणखी दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत, द्विग्विजय सिंग आणि शशी थरूर यामध्ये आघाडीवर आहेत. मात्र महाराष्ट्रातून कोणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे का? याबाबत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही काही सांगता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक किती उमेदवारांमध्ये होणार याबाबत बोलताना ते म्हणाले की, अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.