संजय शिरसाट म्हणतात ‘मी हँगिंग पोझिशन’मध्ये, मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचा पेढा तर कुणाचे चांगले काम ?
राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. नव्या मंत्र्याच्या यादीत काही आमदारांची नावे आहेत. मात्र, या यादीमुळे अनेकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदार संजय शिरसाट काही प्रमाणात नाराज होते.
मुंबई : राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. नव्या मंत्र्याच्या यादीत काही आमदारांची नावे आहेत. मात्र, या यादीमुळे अनेकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदार संजय शिरसाट काही प्रमाणात नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत बोलताना संजय शिरसाट यांनी ही बातमी तुमच्याकडून कळतेय. मी हँगिंग पोझिशनमध्ये आहे. तुमची माहिती खरी असेल तर मी तुम्हाला पेढा चारेन असे ते म्हणालेत. तर माजी मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांनी शिवसेना पक्षाची आमच्या सगळ्यांवर जबाबदारी आली आहे. शिवसेना पक्ष वाढवणे, महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवत ठेवणं, युतीचं सरकार टिकवून ठेवणं ह्या जबाबदारी जास्त मोठ्या समजतो. मंत्रीपद येतात जातात त्याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. पण, मिळालं तर चांगलं काम करू असं म्हटलंय.