Ajit Pawar on Shivsena | निवडणुकीनंतर कळेल खरी शिवसेना कोणाची? अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Ajit Pawar on Shivsena | निवडणुकीनंतर खरी शिवसेना कोणाची आहे ते कळेल असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
Ajit Pawar on Shivsena | निवडणुकीनंतर खरी शिवसेना (Shivsena) कोणाची आहे ते कळेल असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात धुसफूस सुरु आहे. सदा सरवणकर यांनी याठिकाणी मेळावा घेण्यासाठी रीतसर अर्ज दाखल केला आहे. याविषयी पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिवसेनेची स्थापना दसऱ्याच्या दिवशी झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मैदानावर अनेक सभा गाजवल्या. या मैदानावर दसरा मेळावा घेणे ही शिवसेनेची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या सभेत शिवसेनेची पुढील जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी सांभाळावी, असे जाहीरपणे सांगितले होते. पण 20 जूननंतर राज्यात राजकीय नाट्य घडले. त्यानंतर जो बदल झाला आहे, ती जनता बघत आहे. सत्ता हाती आल्यानंतर काय होते हे आपण सर्वजण पाहत असल्याचे ते म्हणाले.