धक्का लागलेल्या महिला पोलीस कर्मचारी सक्तीच्या रजेवर का? - sandeep deshpande

धक्का लागलेल्या महिला पोलीस कर्मचारी सक्तीच्या रजेवर का? – sandeep deshpande

| Updated on: May 20, 2022 | 3:10 PM

Sandeep Deshpande: आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईल, असं सांगतानाच आम्ही दोषी होतो तर त्या महिला पोलिसांना रजेवर का पाठवलं? त्यांना सक्तीची रजा का दिली?

मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनात महिला पोलिसांना धक्का लागल्यानंतर मनसेचे (mns) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी हे गायब झाले होते. मात्र, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही महिला पोलिसांना धक्का दिला नाही. आमच्या धक्क्याने महिला पोलीस जमिनीवर कोसळल्या नाहीत. महिला पोलिसांना आम्ही धक्का दिल्याचं एक तरी फुटेज दाखवल्यास मी आताच राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.नगरसेवक चोरणारे काय मदत करणार? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार?, असा सवाल त्यांनी केला.