पंतप्रधानांना भेटल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर होता, मोदी-शिंदे भेटीत नेमकं काय घडलं?

“पंतप्रधानांना भेटल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर होता”, मोदी-शिंदे भेटीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 22, 2023 | 4:30 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे शिंदे दिल्लीत अचानक रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. शिंदे यांनी आज आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली, 22 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे शिंदे दिल्लीत अचानक रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. शिंदे यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब होत. आज दुपारी त्यांनी संपूर्ण कुटुंबाला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांशी विविध विषयावर चर्चा केली. इर्शाळगड दुर्घटनेपासून ते धारावीच्या प्रकल्पापर्यंतच्या विषयावर ही चर्चा झाली. या भेटीत राज्यातील विकास कामांवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली. या भेटीत आणखी काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…