शिवसेनेच्या 'त्या' बुलुंद तोफेला का आला इतका संताप ? म्हणाले आता महाराष्ट्राला समजेल...

शिवसेनेच्या ‘त्या’ बुलुंद तोफेला का आला इतका संताप ? म्हणाले आता महाराष्ट्राला समजेल…

| Updated on: Feb 18, 2023 | 9:34 PM

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह सोपवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे एके काळी शिवसेनेची बुलंद तोफ म्हणविणाऱ्या नेत्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

खेड : निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह सोपवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे एके काळी शिवसेनेची बुलंद तोफ म्हणविणाऱ्या नेत्याने आपला संताप व्यक्त केला आहे. शिवसेना नेते, आमदार, विरोधी पक्षनेते, मंत्री इतकी पदे या नेत्याला मिळाली होती. नारायण राणे यांच्याविरोधात रान पेटवणारे हे नेते म्हणजे रामदास कदम. शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांची हुकूमशाही, बेबंदशाही संपली. शिवसेना माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असे ते वागत होते. आज त्यांची सद्दी संपली. आज आनंदाचा दिवस आहे. कोकणात शिमगा सुरु झाला. उद्धव यांना आता बाळासाहेब यांचा धनुष्यबाण हातात घेण्याचा अधिकार राहिला नाही. हुकूमशाही चालत नाही. भावनात्मक ब्लॅकमेल चालत नाही हे आता महाराष्ट्राला समजेल, असा टोला त्यांनी लगावला.

Published on: Feb 18, 2023 09:34 PM