Pimpri: पिंपरीत झाडाच्या फांद्या का तोडल्या? म्हणून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
मान्सूनपूर्व कामासाठी वीजवाहक तारांना ज्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करत होते. त्याचवेळी त्यांना मारहाण करण्यात आली. ज्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या, त्या झाडाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने मारहाण केली आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील खराळवाडी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून महावितरण (Mahavitaran) कर्मचाऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. रामेश्वर वाघमारे असे मारहाण (Beaten) झालेली महावितरण कर्मचाऱ्याचे असूनमारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मान्सूनपूर्व कामासाठी वीजवाहक तारांना ज्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करत होते. त्याचवेळी त्यांना मारहाण करण्यात आली. ज्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या, त्या झाडाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने मारहाण केली आहे. फांद्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर पिंपरी पोलीस (Pimpri Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: May 19, 2022 06:27 PM
Latest Videos